shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय मसोबावाडीच्या १४ वर्ष वयोगटातील मुलींनी हॉलीबॉल स्पर्धेत मिळवला प्रथम क्रमांक.

तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय मसोबावाडीच्या १४ वर्ष वयोगटातील मुलींनी हॉलीबॉल स्पर्धेत  मिळवला प्रथम क्रमांक.

संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी शाळेचे नाव लौकिक केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करीत केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केले जात असताना आज रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने इंदापूर तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२२- २३ या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ सकाळी ९ वाजता तालुका क्रीडा  इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह विश्वासराव रणसिंग यांच्या हस्ते संपन्न झाला. 
यावेळी विद्या प्रतिष्ठान बारामतीची क्रीडा शिक्षक मिटकरी सर, रामभाऊ रणसिंग, म्हसोबावाडी चे मुख्याध्यापक महादेव वनवे व इतर विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते . तसेच तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी या क्रीडा स्पर्धेला भेट दिली.
आज झालेल्या तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडीच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींनी हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यश खेचून आणत विद्यालयाचे नावलौकिक केले. त्याबद्दल या संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक  यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
close