shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगाच्या प्रती सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम करणे आवश्यक - तुषार जाधव माजी उपसरपंच निमगाव केतकी



समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगाच्या प्रती सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम  करणे आवश्यक -  तुषार जाधव माजी उपसरपंच निमगाव केतकी

निमगाव केतकी मध्ये दिव्यांगांसाठी काम करणारे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा तुषार जाधव यांनी केला सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगाच्या प्रती सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम  करणे आवश्यक आहे. ३डिसेंबर हा संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो.

या जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी अपंगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी मदत मिळावी या उद्देशाने तुषार जाधव यांचे कडून निमगाव केतकी मध्ये दिव्यांगांसाठी काम करणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष भारत शेंडे,सचिव शरद शेंडे,सदस्य तानाजी बरळ व मारुती आदलिंग, संदीप बारवकर यांचा नारळ व श्रीफळ देत सत्कार केला. तसेच त्यांच्या कामाचे कौतुक केले. भविष्यात काहीही अडचण आली तरी दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी कायम उभा राहीन असा शब्द यावेळी निमगाव केतकी चे माजी उपसरपंच तुषार जाधव यांनी दिला. 


ग्रामपंचतीमधून मिळणारा ५% निधी अद्याप मिळाला नसल्याने  यावेळी दिव्यांग बांधवानी  खंत व्यक्त केली होती. दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतमधून मिळणारा ५%  निधी लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न ही सातत्याने करणार


close