shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राईड ने शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला - रमेश लोढा ..., प्राईडचे स्नेहसंमेलन दिमाखात साजरे


शौकतभाई शेख - श्रीरामपूर
राष्ट्रपिता महात्मा गांधी,महात्मा ज्योतीबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहु महाराज यांच्या विचाराने प्रेरीत होवुन ग्रामिण भागात इंटरनॅशनल स्कुलच्या दर्जाचे शिक्षण संस्था सुरु करुन प्राईड अकॕडमीच्या माध्यमातुन मुरकुटे दांपत्याने  तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला असे गौरोओद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रमेश लोढा यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे आभिजित दळवी, डाॕ.प्रशांत शेटकर, डॉ.निशा शेटकर, सागर वैद्य, माऊली प्रतिष्ठाणचे ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती डाॕ.वंदना मुरकुटे, लायन्स सुनिल साठे, सरपंच सुप्रिया भोसले, शांताराम तुवर आदी मान्यवर उपस्थित होते.

 प्राईडच्या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार पाहायला मिळाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अवयवदान करणाऱ्या दात्यांचा सन्मानही करण्यात आला. प्राईडच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे चिञपट निर्माते अभिजित दळवी म्हणाले की, ग्रामिण भागात इंग्रजी, संस्कृत भाषेसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम डाॕ.वंदनाताई मुरकुटे यांनी सुरु ठेवलेले आहे. येथे दिल्या जाणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षणामुळे भावी पिढी सुसंस्कारीत होणार असल्याचे अभिजित दळवी म्हणाले. 

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आझादी के ७५ साल या थीमवर गीतं सादर केली. ७५ वर्षाच्या देशाच्या विकासात बॉलिवूडचे योगदान यावर गीतमाला सादर केली. सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 
नव्या शैक्षणिक धोरणात अपेक्षित असलेली शिक्षण पद्धतीने प्राईड अकादमीने आत्मसात केली असल्याचे कौतुकोद्गार सिनेट सदस्य सागर वैद्य यांनी केले तर संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक शिक्षणाची मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन डाॕ. प्रशांत शेटकर यांनी यावेळी दिले.यावेळी बाल चिमुकल्यांच्या कला अविष्काराला उपस्थित हजारो पालकांनी व ग्रामस्थांनी भरभरुन दाद दिली.

याप्रसंगी प्रा. कार्लस साठे, विराज भोसले, शिवाजी शेजुळ, संजीव उंडे, राजेंद्र कोकणे, अरुण कवडे, कैलास पटारे, संतोष काळे, बापु दारकुंडे, रवि शेरकर, महेश लासुरे,पाराजी गायके, राहुल बनकर, प्रकाश जाधव, धनराज जगताप, नंदु पटारे, वसंत नागुडे, स्वप्नील बनकर, दिपक बडाख, गोरख तारडे, अबासाहेब रणनवरे, शिवाजी भालदण्ड, प्रकाश आढाव, बाळासाहेब पडोळे, रामनाथ माळवदे,संजय खंडागळे, भरत जाधव, दिनकर गायकवाड, प्राचार्या प्रिती गोटे यांनी प्रास्ताविक करुन लेखाजोखा मांडला तर सुञसंचलन अॕना लोखंडे व वनिता नाईकवाडी, शांभवी शिंदे, रोहीत कवडे, आश्विनी जगताप यांनी केले. तर स्कुल अँकरींग आयुषा उंडे, अनुष्का पवार, तनवी तुवर व तनया पवार यांनी केले शेवटी आभार क्षितीज मुरकुटे यांनी मानले
close