गागरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरला आठवडे बाजार .
४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत केली २० हजाराची आर्थिक उलाढाल.
इंदापूर प्रतिनिधी: ग्रामीण भागातील मुलांना व्यवहार ज्ञान समजण्यासाठी आणि शालेय उपक्रम तसेच आतापासूनच मुलांना व्यवसायाची ओळख व पैसे देवाण-घेवाण समजण्यासाठी समाजधीटपणा येण्यासाठी आठवडे बाजार इंदापूर तालुक्यातील गागरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत बाजार भरवला होता.
या बाजारात तब्बल २० हजारांची आर्थिक उलाढाल झाली असून बाजारातील खरेदीसाठी गावातील पालक वर्ग तसेच महिला पुरुष ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. या बाजारामुळे शाळेचा परिसर आठवड्याचा बाजार असल्यासारखा उत्तमरीत्या दिसत होता. लहान मुले बाजारातील वस्तू, फळे, भाज्या यांची विक्री करीत असताना पालक वर्ग अतिशय कुतूहलाने पाहताना दिसले. बाजारामध्ये विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. या आठवडा बाजार भरवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वसंत फलफले, शिक्षिका मंदाकिनी हेबाडे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक वर्ग यांनी परिश्रम घेतले.इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी चे संचालक सुहास मोरे, प्रशांत घुले, संतोष घोडके,अनिल गायकवाड, रविंद्र तनपुरे, तुकाराम बुटे, भालचंद्र भोसले, प्रविण ढुके,नजीर शिकिलकर, अमोल बोराटे यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली.
तसेच यावेळी औदुंबर कचरे,आबा वीर, ग्रामपंचायत सदस्य पोपट गलांडे ,आजिनाथ कचरे, देविदास वीर, नवनाथ कचरे, रामदास जाधव, भारत जाधव, संतोष मिंड ,धर्मराज धुमाळ, बाळासाहेब नरळे, देविदास वीर, नितीन मिंड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश भोसले, तात्याराम सातव, नाना धुमाळ बापू धुमाळ, अरुण शिंदे, बाळू शिंदे, नाना भोसले, उमेश पवार, संजय नरळे, काळू आगवणे, अनिल धुमाळ ,महेश धुमाळ ,अमोल सातव ,सचिन मिंड ,सचिन लोंढे ,दीपक मिंड, रघुनाथ लोंढे ,बाळू जाधव, मोहन कचरे ,सचिन आवटे, सुरज विर परशुराम चोरमले व इतर पालक वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी नवनिर्वाचित गावच्या सरपंच सौ कोमल औदुंबर कचरे यांचा सत्कार शाळेच्या वतीने संपन्न झाला.

