shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील सरपंच व सदस्य यांचा सत्कार धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने इंदापूर या ठिकाणी संपन्न

आपण कोणत्याही पक्षात काम करा परंतु समाज म्हणून एकत्र या - डॉ. शशिकांत तरंगे.

इंदापूर तालुक्यातील सरपंच व सदस्य यांचा सत्कार धनगर ऐक्य परिषदेच्या  वतीने इंदापूर या ठिकाणी संपन्न

इंदापूर प्रतिनिधी: दि. ३० डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी धनगर समाजाचे निवडून आलेले सरपंच व सदस्य एकूण ६५ उमेदवारांचा सत्कार धनगर एक्य परिषद समन्वय समिती इंदापूर तालुका यांच्या वतीने शाल, हार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी इंदापूर तालुक्यामध्ये एकूण २६ ग्रामपंचायत निवडणुका लागल्या होत्या. त्यामध्ये धनगर समाजाचे एकूण ६५ उमेदवार निवडून आलेले आहेत. त्या उमेदवारांचा राजकारणातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण कोणत्याही पक्षात काम करा परंतु समाज म्हणून एकत्र या. गाव पातळीवरती राजकारण समाजकारण करत असताना हा लांबचा जवळचा गटाचा तटचा असा विचार न करता गावाचा विकास करा. निवडून आलेल्या सदस्यांनी मोठे स्वप्न पहावेत. असे यावेळी डॉक्टर शशिकांत तरंगे म्हणाले. 
तसेच त्यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
यावेळी काळाशी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ करे, विजय रेडके, सुप्रिया करे ,माळवाडी ग्रामपंचायत सदस्य सतीश ठवरे, पोपट शिंगाडे ,न्हावी ग्रामपंचायत सरपंच आशा डोंबाळे, दीपक डोंबाळे सदस्य गुणवंत देवकाते शिरसवडी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, सचिन खामगळ, तानाजी नरुटे रेडनी ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे, शहाजी पाटील, अजय हाके बिजवडी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ हिवरे बोरी ग्रामपंचायत सरपंच मयूर ठोंबरे सदस्य मधुकर वाघमोडे, संतोष धालपे, एडवोकेट दिलीप धायगुडे, हरिदास वाघमोडे, प्रियंका ठोंबरे पडस्थळ ग्रामपंचायत सदस्य गोकुळ कोळेकर, महेंद्र दादा रेडके लाखेवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण खुरंगे तरंगवाडी ग्रामपंचायत सरपंच महादेव वाघमोडे, सरपंच संतोष जाधव गोखळी ग्रामपंचायत उपसरपंच सतीश तरंगे मदनवाडी ग्रामपंचायत सदस्य कुडलिक बंडगर, राजेंद्र देवकाते, अतुल देवकाते, तेजस देवकाते यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी उपस्थित धनगर ऐक्य परिषदेचे कार्यकर्ते संजय रुपनवर, कुंडलिक कचरे ,विशाल मारकड,. यशवंत कचरे, वसंत मारकड, मोरेश्वर कोकरे, दिलीप पाटील, अशोक घोडके व इतर धनगर बांधव उपस्थित होते.
close