shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भा.ज. पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे २२ डिसेंबरला...!

अकोले ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे तरी सर्वांनी अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे.

       अकोले येथे भाजपा कार्यालयास श्री. पवार यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि या अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे   होणार आहे. तसेच भटके विमुक्त अधिवेशनात राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवतजी कराड, राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराजजी अहिर, सहकार मंत्री अतुलजी सावे, माजी खा. डॉ विकासजी महात्मे, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय,प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर,  विश्वास पाठक, अतुलजी वझे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. असे हि श्री. नरेंद्र पवार यांनी सांगितले.
     भाजपा भटके विमुक्त सेलचे युवक जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी सांगितले की, या अधिवेशनात भटके  विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी. तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात भटके विमुक्त आघाडीचे नगर जिल्ह्यातून युवक, युवती मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असेही सांगितले.
       यावेळी भाजपा  तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे व भटक्या विमुक्त सेलचे युवक जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कल्याण जिल्हा उपाध्यक्ष तान्हाजी करपे, अकोले एजुकेशन संस्थेचे सेक्रेटरी सुधाकर देशमुख, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, एन टि‌ सेल युवक तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण, प्रसिद्धि प्रमुख सौरभ देशमुख, नवनाथ मोहिते, मोशिन शेख आदी उपस्थित होते.
close