इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील उद्योजक पिंटूसेठ लोंढे यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने वीट भट्टीचा व्यवसाय निवडला आहे. सध्या बांधकामांमध्ये पक्क्या विटांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते या उद्देशाने लोंढे यांनी कच्च्या तयार केलेल्या विटाचे पक्क्या विटांमध्ये रूपांतर करण्यासाठी जी वीटभट्टी उभारली आहे. त्या वीटभट्टीचे आज दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्वप्निल मखरे, सुभाष खरे, संतोष काळे व इतर मित्र परिवार उपस्थित होते.
यावेळी श्रीधर बाब्रस यांनी पिंटूसेठ लोंढे यांच्या जिद्द चिकाटीचे कौतुक करीत म्हणाले की, जीवनात नोकरीपेक्षा व्यवसाय करून आपले जीवन यशस्वी करावे. त्याशिवाय आपली प्रगती होत नसते. म्हणून युवा पिढीने व्यवसाय क्षेत्रास योगदान देणे गरजेचे आहे अशा शब्दात आपले मत व्यक्त करीत लोंढे यांना व्यवसायास शुभेच्छा दिल्या.

