shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेंट उर्सूला हायस्कूल अव्वल स्थानी..



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) 
सेंट उर्सुला हायस्कूल आकुर्डी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय बास्केटबॉल स्पर्धा सिटी प्राइड स्कूल निगडी येथे पार पडल्या. यामध्ये 14 वर्षाखालील मुलींची सेंट उर्सला हायस्कूल, आकुर्डी आणि कमल नयन बजाज स्कूल संभाजीनगर चिंचवड  यामध्ये स्पर्धा झाली. सेंट उर्सूलला हायस्कूल ने .( *19-7) पराभव करून विजेते पद पटकावले. 

 विजय संघाकडून रिया बोरे, आर्या मुलिक, एल्सा कुट्टी, अनिता बोरसे, युविका कोल्हे, सावर्णी सिसोदे , शर्वरी शिंदे, लिव्या कुट्टी , प्राची सागवी, आकांक्षा खंडागळे, कृष्णल वाघोले यांनी उत्कृष्ट खेळ खेळला. विजय संघाचे प्रिन्सिपल  सिस्टर व्हॅलरी आणि हेडमिस्टर्स सिस्टर बिन्सी त्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संघाला क्रीडा सहाय्यक सचिन वावले,रोहिणी कदम,जोविट  टिशक्यानो आणि मार्गदर्शक निखिल सरीन याचे मार्गदर्शन लाभले आहे.
 फोटोमध्ये क्रीडा शिक्षक सचिन वावले, प्रिन्सिपल सिस्टर ज्वेलरी, प्रायमरी हेडमिस्टरेस्ट सिस्टर बिन्सी, मार्गदर्शक निखिल सरिन आणि खेळाडू.

 सेमी फायनल - सेंट असला हायस्कूल वर्सेस आर्मी पब्लिक स्कूल, देहू रोड 32-06 युविका  कोल्हे -10, रीया बोरे -08, एल्शा कुट्टी -6, अन्विता बोरसे -6,
 सेंट असला हायस्कूल वर्सेस कमलन बजाज स्कूल स्कोर 19 होता.
close