इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसाठी ११९ मतदान केंद्रावर आज होणार मतदान.
.इंदापूर प्रतिनिधी: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ च्या कार्यक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसाठी आज रविवार (ता.१८) रोजी मतदान प्रक्रिया सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत होणार आहे.एकूण २६ ग्रामपंचायतीसाठी ११९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील पडस्थळ, हिंगणगाव, अजोती-सुगाव, माळवाडी, पिंपरी खुर्द- शिरसोडी, बिजवडी, झगडेवाडी, डाळज नं. २, डाळज नं.३, डाळज नं. १, - न्हावी, थोरातवाडी, कळशी, रणमोडवाडी, जांभ, मानकरवाडी, कुरवली, म्हसोबाचीवाडी, मदनवाडी, लाखेवाडी, बोरी, रेडणी, बेलवाडी,डिकसळ, गंगावळण,सराटी या २६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ७१ उमेदवार तर या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४६ सदस्य पैकी ३३ झालेल्या बिनविरोध वगळता उर्वरित २१३ जागांच्यासाठी ४७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सदर निवडणूक प्रक्रीया यशस्विपणे राबवण्यासाठी ८३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आचार संहितेचे पालन करण्यात यावे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळित पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे, असे आवाहनही श्रीकांत पाटील यांनी केले.

