shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर जे घडायचं नव्हतं ते घडलंच......! एका आश्रम शाळेतील युवतीचा बळी घेतलाच..! भ्रष्टाचार्यांवर लगाम घालणार कोण..? पत्रकार कैलास पवार यांची खंत..


    कोंबडी चोर,अंडी चोर यांची राजकारण्याकडून पाठराखण तर कर्तव्यदक्ष चांगले अधिकाऱ्याविरुद्ध राजकारणी यांचे कुरगुडीचे राजकारण....!

इंदापूर तालुक्यामध्ये कर्तव्यदक्ष,  चांगल्या अधिकाऱ्यांना काम करू दिले जात नाही... कोंबडी चोर ,अंडी  चोर यांच्यासाठी खासदार , आमदार  नगरसेवक, पुढारी,  स्वयंघोषित कार्यकर्ते नेते  यांचे फोन त्या अधिकाऱ्यांना येत असतात... अशी चर्चा आहे ....!कारवाई करु  नका ... चोऱ्या करणारे , कायदा तोडणार्यांवरती कारवाई करून त्यांना धडा शिकवून चांगल्या मार्गाला लाावणे , सुव्यवस्था निर्माण करणे , यासाठी काही कर्तव्यदक्ष अधिकारी आपापलं काम करत असतात..... पण इंदापूर तालुक्यात पंचायत समिती , कृषी विभाग ,तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे चांगला अधिकारी आला....तर  त्या अधिकाऱ्याच्या विरोधात ज्यांना टाळूचं लोणी खायला मिळत नाही असे अधिकारी तुफान षडयंत्र करतात..... इंदापूर तालुक्यात गेल्या काही अनेक दिवसात जनतेच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याचे काम झाले.. परंतु ते दोन ते तीन महिन्यात "खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा..!" हा प्रश्न तात्काळ निर्माण झाला....;  निष्कृष्ट काम करणार्या बीनदिक्कतपणे ठेकेदारांची पाठ थोपटले जाते... कार्यकर्तेही त्यांचे गुणगान गातात.., पण चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाही आणि चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी पुढे आलाच तर त्याच्यावर कारवाई केली जाते... त्याच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल केले जातात.... 

इंदापूर तालुक्यात सगळ्यात मोठा घोळ आणि झोल हा सार्वजनिक बांधकाम उपविभागामध्ये आहे.... हजारो तक्रारी होऊन स्वतः हुन कारवाई केल्या जात नाही ....इंदापूर तालुक्यातील अनेक रस्त्याच्या साईट पट्टीचा निधी धनदांडग्या शेतकऱ्यांनी बळकवल्यामुळे  अपघातात भरीव वाढ होते आहे.... रस्त्यावर खताचे  उकिर्डे, गंजी लावल्या जातात....गुरेढोरे बिनधास्त बांधली जातात... इंदापूर शहरातील बाबा चौक ते आय कॉलेज पर्यंत दोन्ही बाजूने फळ विक्रेते, हॉटेल, चायनीज वाल्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेला आहे ...पण ते झालेले अतिक्रमण कुणी काढण्यासाठी धजावत नाही...? त्यामुळे येणार्या- जाणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलींना त्रास होतोय..... अनेक चांगल्या प्रश्नावर आवाज उठवला तर त्या कार्यकर्तांचा विविध मार्गातून आवाज दाबला जातो.... त्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल केला जातात.... त्यामुळे इंदापूर तालुक्यातील अनेक चांगले अधिकारी लवकरच आपला पदभार सोडून बदल्या करून घेणार आहे अशी दबक्या आवाजात चर्चा....?
 जो तो आपल्या राजकीय पक्षाची पाठ थोपटण्यात दंग आहे...  पत्रकार मंडळी दर्जेदार बातम्या देऊन सतत आरसा दाखवायचं काम करतात त्यांच्याकडे डोळं झाक केलं जातंय...! कारण का किती जरी एकट्या व्यक्तीने आरसा दाखवायचं काम केलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं..किंवा सर्वजण एकत्र येऊन तो आरसा प्रखरतेने तोडण्याचा प्रयत्न करतात.... ! त्यामुळे इंदापूर मध्ये चांगला अधिकारी काम करण्यासाठी आला तरी त्याला अडचणी खूप आहेत.... बोक्यासारखे खाऊन माजमस्ती करणारे, लोकांच्या टाळू वरचे लोणी खाणारे जोमात आहेत... बरच काही लिहिण्यासारखा आहे पण लिहिणारा सुद्धा कुठवर लिहिणार आहे..... ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात त्यांना सुद्धा स्वतःच्याच घरची आपलीच माणसं त्रास देत होते.... तसेच एखादा अधिकारी किंवा एखादा पत्रकार एखाद्या चांगल्या विषयाशी निगडीत सतत लिहीत असला तर त्याच्याविरोधात सुद्धा वेगवेगळे षडयंत्र आखली जातात.... शेवटी मताच राजकारणात आहे.

सामान्य जनतेचा, विद्यार्थ्यांचा, मुलींचा जीव गेला तरी राजकीय पुढारी आणि मताचे भिक मागणाऱ्यांना फारसे काही फरक पडत नाही..... हप्ते खोर आधिकाऱ्यांना कारवाई  करण्याचे धाडस नाही आणि एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी कारवाई  करण्याचा प्रयत्न  केला तर सर्वजण मिळून त्यांच्या अडचणीत वाढ करतात.... ही शोकांतिका ..? त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकतर "आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातं" अशीच परिस्थिती आहे.

कम्रश:-
पत्रकार कैलास पवार
इंदापूर
close