तेल्हारा: दि.१० :-
उच्च शिक्षण तंत्र मंञी ना.चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण संत पिठात भाषण करताना म्हटले कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रपिता महात्मा फुले,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा उभारल्यात या विधानाच्या निषेधार्थ श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग तेल्हारा येथील कार्यकर्ते यांनी तेल्हारा पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली.
या तक्रारीत म्हटले आहे की, ना.पाटील यांनी महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वरील विधान अत्यंत चुकीचे असुन त्या बाबत पाटील यांनी समता भूमी,म.फुले वाडा पुणे येथे येऊन महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जाहीर माफी मागावी.
अन्यथा श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व बहुजन समाज तीव्र आंदोलन छेडतील. या तक्रारीवर रोशन बोंबटकार, प्रशांत खाडे, संजय मानकर, पुरुषोत्तम मानकर, दीपक लोणकर, नरेंद्र सुईवाल, रतन गिरे, सुशील तायडे, वैभव सोनवणे इत्यादी च्या सह्या आहेत.

