प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
सोलापूर: दि. 4 / सोलापूर शहर शालेय बुद्धिबळ स्पर्धा दि. 29/11/2022 रोजी राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे पार पडली. सदर स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटामध्ये एकूण 110 जणांनी सहभाग नोंदवला होता.
अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत के.एल. ई इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी विराज राठी याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण 7 फेऱ्यांमधून 6 गुण प्राप्त करत चौथा क्रमांक मिळवला तर त्याचबरोबर शिकत असलेली कु. श्रेया सारडा हिने मुलींच्या गटात 6 पैकी 5 गुण प्राप्त करत चौथा क्रमांक पटकावला. तसेच कु.आरोही पाटील हीने सदर स्पर्धेत १७ वयोगटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
सदर विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू श्री. गणेश मस्कले सरांचे मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल ग्रँडमास्टर चेस अकॅडमीतील सर्व सदस्यांकडून विजेत्यांचे व इतर सहभागी खेळांडूचे तसेच प्रशिक्षक श्री. गणेश मस्कले सरांचे अभिनंदन करण्यात आले.

