✊ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, औरंगाबादमध्ये आज भाजप आमदार तथा सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर शिवभक्तांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी अतुल सावे यांनी आंदोलकांची भेट घेतली, तसेच आंदोलकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याची हमी दिली.
👉 सावे यांच्या औरंगाबाद शहरातील शहानुर मिया दर्गा येथील घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी मंत्री सावे यांना, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का ? असा जाब विचारण्यात आला असल्याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

