shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन एन सथ्था औषधनिर्माण महाविद्यालयाचा झोनल लेवल अविष्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक ...


 प्रतिनिधी : शिवा म्हस्के

नगर : ११  /   राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या एन एन  सथ्था औषधनिर्माण महाविद्यालया अहमदनगर च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर अविष्कार स्पर्धा 2022 मध्ये फार्मसी युजी प्रवाहात सुवर्णपदक व प्रथम पारितोषिक मिळाले
राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या एन एन सथ्था महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या एन एन सथ्था औषधनिर्माण महाविद्यालया अहमदनगर च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर अविष्कार स्पर्धा 2022 मध्ये फार्मसी युजी प्रवाहात सुवर्णपदक व प्रथम पारितोषिक मिळाले.

 श्रीयश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च औरंगाबाद येथे एक पार पडलेल्या झोनल लेवल अविष्कार स्पर्धा 2022 मध्ये  महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी फार्मसी च्या कु. समिक्षा भामरे आणि कु. वैष्णवी शिंदे  या विद्यार्थिनींना विभागीय स्तरावरील मेडिसिन अँड फार्मसी विषयातील प्रदर्शनासाठी सुवर्णपदक मिळाले अशी माहिती विद्यालयातील प्राचार्य डॉ. विशाल पांडे यांनी दिली. विद्यार्थिनींना प्रणया मिसार यांचे मार्गदर्शन लाभले. 

विद्यार्थिनींची निवड ही अविष्कार 2022 युनिव्हर्सिटी लेव्हल साठी झाली आहे. प्रथम क्रमांक व सुवर्णपदक मिळाल्याबद्दल सर्वांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकाचे अभिनंदन केले आहे संस्थेचे सचिव माननीय डॉ विद्याधर जी उर्फ शिवाजीराव काकडे साहेब व जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदा ताई काकडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मण बिटाळ व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विशाल पांडे यांनी संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले
close