shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तनिष्का गायकवाडची सहाव्यांदा राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ११ /   नुकत्याच पुणे येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग, रोलर हॉकी व इनलाइन हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 सदर स्पर्धेत अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटना संचलित टीम स्पीड स्केटिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. पुणे येथे दि . १३ व १९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या निवड चाचणी व राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षणात महाराष्ट्रातील निवडक उत्कृष्ट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू  सहभागी झाले होते. या निवड चाचणी स्पर्धेत तनिष्का सतीश गायकवाड देखील सहभागी झाली होती. तिच्या सर्वोत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिची निवड १७ वर्षाआतील स्केटिंग रोलर हॉकी या प्रकारात दि . ११ ते २२ डिसेंबर दरम्यान बेंगलोर, कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. 

 तनिष्का ही अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटना संचलित टीम स्पीड स्केटिंग अकॅडमीची खेळाडू असून श्री . दादासाहेब गायकवाड यांची नात आहे. व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. तनिष्का गायकवाडची स्पर्धेत सहभागाची ही सलग सहावी वेळ आहे . शैक्षणिक वर्ष २०१६-१७ जोधपूर, राजस्थान. २०१७-१८ कुरुक्षेत्र, हरियाणा. २०१८-१९ विशाखापट्टनम, आंध्रप्रदेश व  २०१९-२० विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश  २०२१-२२, व आता २०२२-२३ या वर्षी बेंगलोर, कर्नाटक तसेच यापूर्वी झालेल्या स्पर्धेत अगदी एक गुणानी तनिष्काला पदकाने हुलकावणी दिली होती. सदर राष्ट्रीय स्पर्धेत पदकाची कमाई करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करुन घेण्याचा तिचा मानस आहे. 

वयाच्या अवघ्या तीन वर्षांपासून ती स्केटिंग खेळाचा सराव बुरुडगाव रोड येथील महानगर पालिका, विभागीय कार्यालय येथील संघटनेच्या अधीक्रुत प्रशिक्षण केंद्रात करत आहे. आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली आहे. आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत तीने सलग सहाव्या वेळी राष्ट्रीय स्पर्धेत  निवडीची कामगिरी केली आहे. सदर बाब ही जिल्हा तसेच राज्यासाठी देखील भूषणाची आहे. असे गौरवोदगार अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव श्री. असीफ बाबुलाल शेख यांनी केले. 

तनिष्काला राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री. सतिश गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. तनिष्काच्या निवडी बाबत अनेकांनी तिचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
close