प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २ / भिंगार येथील सौरभ नगर भागातील हिंदुराष्ट्र सेनेचे भिंगार शहर अध्यक्ष
नाना उर्फ सतिष मोरे यांनी एका वासराला जीवदान दिले आहे .
भिंगार येथील सौरभ नगर भागात मोकाट फिरणाऱ्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . परंतु येथील ग्रामपंचायत या गोष्टीकडे लक्ष देत नाही . पण येथील सामाजिक कार्यकर्ते नाना मोरे यांनी आजपर्यंत अनेक मुक्या जनावरांना जीवदान दिले आहे .
अशाच एका गाईने नुकताच एका वासराला जन्म दिला परंतु काही कारणास्तव भुकेले वासरू एकटे पडले . हे पाहताच नाना मोरे यांनी वासराला घरी आणून त्याचा सांभाळ केला .
मोरे यांचे सामाजिक कार्य पाहून परिसरातील नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले .

