shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा कीर्तनकार ह भ प दादा महाराज रंजाळे यांचे कीर्तनाची आयोजन..!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):
 शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला शिर्डी येथे कीर्तन सोहळा झाला पाहिजे अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे.

असा दृष्टांत देखील काही भक्तांना झालाय तो अनुभव परम साई भक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते यांना सांगितला व त्यांनी हा बाबांचा आदेश समजून विजुभाऊंनी ठरवले की दर महिन्याच्या मोठ्या एकादशीला कीर्तनाचे आयोजन करण्यात येईल कीर्तनाची तेरावी सेवा आहे दिनांक ४/१२/२०२२ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळात कीर्तन सोहळा होणार आहे.

कीर्तनाचे ठिकाण विजुभाऊ कोते यांच्या वस्तीवर.. शेवंताबाई मंदिराजवळ..एअरपोर्ट रोड, श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी कीर्तन श्रवणाचा व साई खिचडी चा लाभ घ्यावा तेरावी कीर्तनाची सेवा श्री साई निर्माण परिवाराच्या वतीने होणार आहे तरी भाविकांनी कीर्तनाचा व साई खिचडी चा लाभ घ्यावा असे आवाहन विजुभाऊ कोते यांनी केले आहे.
close