प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : 2 / जिल्हा क्रीड़ा कार्यालय (महाराष्ट्र शाशन क्रीड़ा विभाग) अंतर्गत आयोजित लॉन टेनिस स्पर्धा मध्ये कु . श्रीवर्धन झंवर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 14 वर्ष मुलांमधे प्रथम क्रमांक पटकाविला तसेच जलतरण स्पर्धामध्ये वीर ढोने याने 50 मीटर फ्री स्टाईल मध्ये तृतीय तर 200 मीटर फ्री स्टाईल मध्ये प्रथम क्रमांक पटकावून दोघंही आगामी होणार्या पुणे विभागीय स्पर्धांसाठी निवड निश्चित झाली आहे.
या यशाबद्दल प्राचार्या मा. जयश्री मेहेत्रे मॅडम यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडूना क्रीड़ा शिक्षक श्री. प्रदीप पाटोळे, श्री. जावेद शेख व प्राजक्ता आठरे यांचे मार्गदर्शन लाभले.

