shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद पुणे ,अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) करण्यात येणार - ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे

जिल्हा परिषद पुणे ,अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) करण्यात येणार - ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे 

गावामधील सांडपाणी प्रश्न कायम स्वरूपी   मिटणार.. एकता  संस्थेचे चंद्रकांत भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्फत करण्यात आला गावचा सांडपाण्याबद्दलचा सर्वे.

इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी गावांतर्गत व वाड्या वस्त्या मधील सांडपाण्याची व्यवस्था योग्य अशी व्हावी या उद्देशाने आज दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण )टप्पा क्र-२ जिल्हा परिषद पुणे ,अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) करण्यात येणार असून त्या अनुषंगाने वडापुरी गावामधील आणि सर्व वाड्यावस्तीमध्ये सांडपाणी यावरती काम करण्यात येणार आहे .यामध्ये ७०%निधी जिल्हा परिषद आणि ३०% निधी हा १५वा वित्त आयोग ग्रामपंचायत यांनी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .त्यामुळे गावामधील सांडपाणी याचा कायम स्वरूपी प्रश्न मिटणार आहे .याचा सर्वे आज एकता  ग्रामविकास या संस्थेचे चंद्रकांत भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी संदीप बगाडे यांच्या मार्फत करण्यात आला याची माहिती वडापुरी चे ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे यांनी दिले. या सर्वेक्षणावेळी गावातील सर्व परिसर व वाडीवस्ती या ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्षात पाहणी करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत  कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
close