हजरत चाँदशाहवली बाबा यांच्या उरुसाला संदलने जल्लोषात सुरुवात .
इंदापूर( प्रतिनिधी) : ग्रामदैवत सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान व एकात्मतेचे प्रतिक हजरत चाँदशाहवली बाबा यांच्या उरुसाला संदलचा लेप लावून जल्लोषात सुरुवात झाली.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मालोजीराजे भोसले यांचे इंदापूर शहर हे ऐतिहासीक वतनी जहागिरीचे गाव आहे . इंदापूरच्या धार्मीक व सांस्कृतिक इतिहासात हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गाहचे अनन्यसाधारण महत्व आहे . यंदाचे उत्सवाचे ४५८वे वर्ष आहे . हिंदू मुस्लीम धर्मीयांमधे या दर्गा विषयी अपार श्रध्दा आहे . सोलापूर , पुणे , मुंबई , नगर या ठिकाणाहून भाविक उरुसाला येतात .
दि .१-१२-२०२२रोजी सायंकाळी परंपरेनुसार इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टि .वाय. मुजावर व त्यांचे सहकारी स्टाफ गल्लफ व फुलांची चादर वाजत-गाजत निघाले . मुख्य बाजारपेठेतून येताना प्रमुख मानकरी हमीद आत्तार यांचे घरातून परंपरेनुसार संदल घेउन वाजत-गाजत चाँद शाहवली बाबाच्या दर्गाह मधे पोहचला .
मालोजीरांजेंची गढी असलेल्या ठिकाणी पुर्वी पोलीस ठाणे व तहसिलदार कार्यालय होते .व त्यांचा कारभार हा गढीवरून चालत असे . मालोजीराजे हे सरदार होते . त्यांच्या पश्चात या परगण्याचा असलेला सरदार हा गल्लफचा मानकरी ठरून त्यांचे हस्ते दर्ग्याला गल्लफ व फुलांची चादर चढविल्या नंतर उरूसास सुरुवात होते तर संदल (चंदनाचा लेप) चढवण्याचा मान हा हमीद आतार यांचे वाडवडिलां पासून त्यांचे घराण्याकडे आहे. आताची चौथी पिढी अजूनही पंरपरा चालवत आहे .
इंग्रज राजवटीत येथील इंग्रज अधिकारी देखील बाबांच्या दर्गास फूलांची चादर चढवीत असत . स्वातंत्र्यांनंतर ही परंपरा पोलिस चौकीचे अधिकारी यांना फूलांची चादर चढवण्याचा मान आजही कायम आहे .
मुस्लीम राजांच्या राजवटीत सूफी संताना अनन्य साधारण महत्व होते .
ह . चांदशाहवली बाबांचे दर्ग्याचे पुजारी व ट्रस्टी अब्दुल गफार मुजावर व जाफर मुजावर हे देखभाल करित होते . त्याचे पश्चात त्यांची मुले मुनीर मुजावर व महामुद मुजावर हे देखभाल व पुजाअर्चा करित आहेत . चारही बाजुंनी बुरुज असलेल्या गढीच्या पायथ्याशी विविध प्रकारची दुकाने थाटलेली असतात .पंचक्रोशीत पिकणाऱ्या पहिल्या पिकाचा नैवेध मलिदा म्हणून बांबांच्या दर्गाला दाखवला जातो .
या उरुसा निमित्त सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील व्यापाऱ्यांच्या रेवडीचे खास आकर्षण असते . तसेच खेळणी , पाळणे याने परिसर गजबजून गेला आहे .
उरूस उत्सव कमीटीचे अध्यक्ष आझाद पठाण
उपाध्यक्ष महादेव चव्हाण .हमीदभाई आत्तार,शेरखान पठाण,ईब्राहीम शेख,मतीन शेख,मुनीर मुजावर,हाजी मूनीर बेपारी,भंडलकर इ .परिश्रम घेतले .

