shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेटफळ तलावातून रब्बीच्या पिकांसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

शेटफळ तलावातून रब्बीच्या पिकांसाठी  आवर्तन सोडण्याची मागणी 

शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे मंडळाकडे केली निवेदनाद्वारे मागणी.
      इंदापूर प्रतिनिधी: शेटफळ तलावातून रब्बीच्या पिकांसाठी  आवर्तन सोडण्याची मागणी शेटफळ तलाव बचाव कृती समितीने कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे मंडळाकडे केल्याची माहिती अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देतांना पाटील म्हणाले,रब्बीच्या गहू ,ज्वारी,हरभरा इ.पीकासाठी तलावातून टेल टू हेड असे आवर्तन तातडीने सोडून सिंचन करण्याबाबत शेतकरीवर्गाने विचारणा केल्यामुळे कृती समितीने कार्यकारी अभियंता,श्री.राजेंद्र धोडपकर,उपविभागीय अधिकारी श्री.अश्विन पवार व शाखाधिकारी श्री. सावंत यांच्याकडे मागणी केली आहे. समक्ष संपर्क साधून याबाबतचे लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात चार मागण्या केल्या आहेत (1)तातडीने रब्बीसाठी आवर्तन सोडण्यात यावे.(2)दारे क्रमांक एक ते तेवीस पर्यंत कॅनाॅलमध्ये साठलेला सर्व कचरा यंत्रांद्वारे काढून घेण्यात यावा
(3)सर्व पाणी वापर संस्थांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात यावी.(4)कालवा निरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी.
close