आम आदमीचे होणार तालुक्यात जोरदार पदार्पण
*युवा संवादच्या माध्यमातून तालुक्यातील समस्यांबाबत होणार बाबत मुक्त चर्चा आणि त्यातून समस्या त्यांच्या निरकरणार्थ कृती कार्यक्रमचे भविष्यात ठरविणार धोरण
*"युवा संवाद"आम आदमीच्या वतीने आयोजित तालुक्यातील आगळावेगळा पहिलाच कार्यक्रम!
*या कार्यक्रमाकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले लक्ष!
खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नां संदर्भात साधक-बाधक चर्चा करण्यासाठी रविवारदि.४डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता "मीरा मंगल कार्यालय" चाकणता. खेड जि. पुणे या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या युवा संवाद मेळाव्यात युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. ‘‘युवा संवाद’’ मेळाव्याद्वारे तालुक्यातील प्रमुख प्रश्न (समस्या)आणि उपाययोजना याबाबत विचारमंथन करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती आप युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी दिली.
तालुक्यात होणाऱ्या या"युवा संवाद" कार्यक्रमाला आम आदमी पक्ष प्रदेशाध्यक्ष मा.रंगा राचुरे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, मा. अजिंक्य शिंदे, राज्य संघटक मा.संदीप सोनवणे, पुणे संयोजक, मा. मुकूंदजी किर्दत आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन/संवाद साधणार करणार आहेत.
खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील पायाभूत सोयी-सुविधा आणि प्रलंबित प्रकल्प याबाबत युवकांमध्ये अनेक प्रश्न आहेत. तालुक्यातील समस्या आणि त्यावर उपाययोजना याबाबत आम आदमी पार्टीकडून एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, अशी या "युवासंवाद" कार्यक्रमाच्या मागील भूमिका आहे. या "युवा संवाद"कार्यक्रमामुळे भविष्यात तालुक्यातील प्रश्नांना दिशा मिळून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात युवकांची सकारात्मक दृष्टीने काम करणारी फळी निर्माण करणे असा हेतू आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी खेड तालुका आम आदम पक्षाचे युवा अध्यक्ष, मा.मयूर दौंडकर, खेड तालुका आम आदमी शेतकरी संघटनेचे, मा.भरतशेठ पवळे, आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेश सहसंघटक मा.संदीप पाटील, मा. शहा आलम बेग, मा.संदीप शिंदे, मा.साजिद मुलानी, मा.निर्मल साबळे, मा.पंढरीनाथ जरे, मा. विशाल दुर्गाडे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. मयूर दौंडकर, तालुकाध्यक्ष, आम आदमी पार्टी, खेड- आळंदी.
मोबाईल क्रमांक : 9762331727

