shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..!



शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
संविधान दिनानिमित्त व्ही.पी.एस हायस्कूल व डी.पी.मेहता ज्युनिअर कॉलेज लोणावळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या अंजनी गानू, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक सुनीता ढिले, शिक्षकेतर प्रतिनिधी जयराम उंबरे उपस्थित होते.

          शाळा दोन सत्रांमध्ये भरत असल्यामुळे सकाळ सत्रातील कार्यक्रम सकाळी तर दुपार सत्रातील कार्यक्रम दुपारी घेण्यात आला. विद्यार्थ्यांना संविधानचे महत्त्व, संविधानाची निर्मिती याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
       शाळेमध्ये दोन माध्यमांची मुले शिक्षण घेतात म्हणून उद्देशिकेचे वाचन मराठी व इंग्रजी दोन भाषांमध्ये करण्यात आले. मराठीमधील उद्देशिकेचे वाचन अलकनंदा पाटील तर इंग्लिश मधील उद्देशिकेचे वाचन अनुजा गोसावी, सुनिता बनकर यांनी केले.
     २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामधील शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
    
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा परदेशी व गंगाधर गिरमकर तसेच कार्यक्रमाची तयारी सेवक गजानन कदम, सिताराम घारे व मुकुंद जगताप यांनी केले.
close