shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशातील ७० टक्के जनता कोणत्या ना कोणत्या योजनांची लाभार्थी - शिर्डी येथे असंघटित कामगार व शेतमजुरांचा "धन्यवाद मोदीजी" अभियानात सहभाग


शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
 शिर्डी :- अहमदनगर जिल्ह्यातील पीएम योजनेच्या लाभार्थ्यी आणि भाजपा कामगार मोर्चा पदाधिकाऱ्याची बैठक शिर्डी येथे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, यांच्या उपस्थितीत पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरु केलेल्या कल्याणकारी योजनेचा १०० कोटींहून अधिक जनतेला मिळाला आहे, देशभरात एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के जनता कोणत्या ना कोणत्या योजनांची लाभार्थी आहेत, हे सत्य सर्वांसमोर मांडा असे विचार कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी मांडले.

सदर कार्यक्रमात लाभार्थ्यांनी मनोगतात पंतप्रधान मोदी जी च्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली 
 यावेळी कामगार मोर्चाचे सरचिटणीस हनुमंत लांडगे, उपाध्यक्ष चंद्रकांत महाडिक, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रताप शिंदे, प्रदेश सदस्य  तथा अहमदनगर उत्तरचे प्रभारी नानासाहेब शिंदे, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष सताश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सरचिटणीस निवृती जावळे, नेवासा तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे,रामदास वाकचौरे,गणेश शिंदे,शंकर बिराडे, राहुल आढगळे,पोपट शेकडे,बाळासाहेब लोखंडे,कादिर पठाण,बाळासाहेब अरगडे,आयाज सय्यद, बालम सय्यद आणि शेकडो लाभार्थ्यी उपस्थित होते. त्याप्रसंगी भाजप नेते नानासाहेब शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
close