shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिरुपती बालाजी येथे साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
 
श्री महामंडलेश्वर महंत स्वामी काशिकानदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तिरुपती बालाजी संस्थान व श्री साईबाबा पालखी सोहळा समिती, शिर्डी व मिरजगाव जिल्हा अहमदनगर येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पाच दिवस तिरुपती बालाजी येथे साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. 


तिरुपती बालाजी संस्थानचे अध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रबोधन करून मंहत स्वामी काशिकानदजी महाराज यांच्या हस्ते विना पूजन व श्री सोरभ शेठ बोरा विश्वस्त तिरूपती बालाजी संस्थांन यांचे हस्तेसाई चरित्र पारायण स सुरुवात झाली या कार्यक्रमात सकाळी साई चरित्र पारायण दुपारी हरी किर्तन ह भ प ढमाले महाराज, ह भ प रमेश महाराज क्षीरसागर, ह भ प ज्ञानेश्वर महाराज टेकाळे, ह भ प सविताताई शास्त्री महाराज, लहू महाराज कराळे यांचे हरिकीर्तन चालू आहे.

 या कार्यक्रमात काल्याचे किर्तन श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी महंत काशीकानदजी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रम ची सांगता होणार आहे. या कार्यक्रमात ह भ प राजेंद्र महाराज गोरे मिरजगाव व ग्रामस्थ ज्ञानेश्वर आश्रम शिर्डी चे विद्यार्थी व साई पालखी सोहळा समिती शिर्डी यांचे सहकार्य लाभले आहे.
close