राहाता:- नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार डॉ.मोहसिन शेख,मंडळ अधिकारी, राहाता यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ माधवराव पाटील यांनी कार्यालयास पत्र पाठवून पुरस्कारा संदर्भात कळविले आहे.
रविवार दि. 4 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता नगर येथील माऊली सभागृहात या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था या राष्ट्रीय उपक्रमशिल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक तथा राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सामाजिक बांधिलकी जोपासणार्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.श्री.फ.मु शिंदे,महाराष्ट्र विधानपरिषदचे आमदार मा.श्री.सुधीर तांबे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सुधा कांकरीया यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

