नगर :- नगर जिल्ह्यात काही काळ राजकारण गाजविणारे माजी आमदार, माझी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचे ७२ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते इ.स.१९८९ -१९९४ आमदार तर इ.स. २००४- इ.स.२००४ या काळात खासदार राहिले आहेत.
काल (दि. २) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्व.तुकाराम गडाख पाटील यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना नगरच्या दवाखान्यात तात्काळ उपचारार्थ नेण्यात आलं.
दरम्यान, रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
माजी खासदार स्व. तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
माजी खासदार स्व. तुकाराम गडाखांनी त्यांच्या राजकीय जीवनात कडवट असा संघर्ष केला. धर्मग्रंथांच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अध्यात्मिक तत्वज्ञानाचंही प्रबोधन केलं.
माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचा धाडसी स्वभाव व कार्यकर्त्यांना संभाळण्याची मोठी ताकद तसेच जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी काही काळ राजकारणात एक वेगळे वलय निर्माण केले होते. त्यांना 'भाऊ" या आदरतिथ्य नावाने ओळखले जात होते. राजकारणातील तुफाणी व्यक्तीमत्व असलेले माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना जीव लावणारा लढवय्या नेता हरपल्याची जनभावना निर्माण झालेली आहे.
‘शिर्डी एक्सप्रेस ’ न्युज नेटवर्कच्या परिवाराची माजी खासदार तुकाराम गडाख यांना भावपूर्ण श्रध्दांजली …!

