श्रीरामपूर (वार्ताहर): बुद्धी निर्मळ असेल तर जग शुद्ध दिसते. श्रीकृष्ण हे महाभारताचे मूळ आहे. श्रीमद भागवत हे शुद्ध भक्तीचे चिंतन आहे. श्रीकृष्णभक्तीच्या श्रवणला चिंतनभक्तीची जोड देण्यातच जीवनाची सार्थकता आहे.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर भागातील श्रीदत्त मंदिरात आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या चौथे विचारपुष्प गुंफताना ह.भ.प.गोविंद महाराज मलिक बोलत होते.बाबासाहेब यादव,सौ.लताताई यादव, प्रा.बाळासाहेब बोरुडे, सौ. छायाताई बोरुडे, श्री व सौ.मोकाटे इत्यादींनी संतपूजन केले.ह.भ.प.गोविंद महाराज यांनी परीक्षित राजाला मिळालेला शाप, ध्रुवबाळ, शबरीकथा, नारदमुनी कथा, बळीराजा कथा, वामन अवतार कथा विशद केली.चि.तेजस प्रकाश भालेराव यास वामनरूप देण्यात आले.
श्रीकृष्ण जन्मसोहळा मोठया भक्तीभावाने साजरा करण्यात आला.डॉ. बाबुराव उपाध्ये व सौ.मंदाकिनी उपाध्ये यांचा नातू तसेच भारतीय आर्मीतील मेजर नंदकुमार सैंदोरे,प्रा.सौ.पल्लवी सैंदोरे यांचा मुलगा श्रीराम यास कृष्णरूपात मिरवण्यात आले.ह. भ. प. रेखाताई गायकवाड, कोपरगाव यांनी संत आणि समाज, श्रीकृष्ण जन्ममहत्व सांगून ह. भ. प.गोविंद महाराज यांच्या मुखातून गोविंदकथा ऐकणे भाग्याचे असल्याचे सांगितले.यावेळी सभापती डॉ. वंदना मुरकुटे,गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, बाळासाहेब बोंबले, विठ्ठल देवरे, रावसाहेब औताडे, मुख्याध्यापक सौ.सुमती औताडे,शिवराम जेधे, नायब तहसीलदार शेलार, विश्वनाथ गवारे, कचरू निकम, जालिंदर यादव,तेलोरे,डॉ.बाबुराव उपाध्ये,सौ.मंदाकिनी उपाध्ये, सौ.जयश्री जोर्वेकर,श्रीमती सिंधूताई पाटील, सोपानराव काकडे, सौ.गौरी निकम, ताराताई सैंदोरे, जायभाये, आदींसह भक्तगण उपस्थित होते.

