shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरिनाम सप्ताहातूनच नव्या पिढीला चांगले संस्कार मिळतात - वीरसिंह रणसिंग

हरिनाम सप्ताहातूनच नव्या पिढीला चांगले संस्कार मिळतात - वीरसिंह रणसिंग

फोटो:शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थान येथे महापूजा करताना,माजी सभापती विलासराव वाघमोडे,व इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग व मान्यवर. 
इंदापूर(प्रतिनिधी): शहाजीनगर दत्त मंदिरात, दत्त जन्मोत्सवानिमित्त गेल्या १९ वर्षापासून अखंड चालणारा हरिनाम सप्ताह,भजन,कीर्तन, प्रवचन याच हरीनामातून या भागातील नागरिकांवर,भक्तगणांवर संस्कार,संस्कृती खऱ्या अर्थाने रुजवतात अशी माहिती इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे मुख्य सचिव वीरसिंह रणसिंग यांनी दिली.

      दत्त देवस्थान शहाजी नगर येथील गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात सोमवार(ता.५ डिसेंबर)रोजी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे व त्यांच्या सुविद्य पत्नी वैजयंता विलासराव वाघमोडे,तसेच इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान सचिव,पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळ सदस्य विरसिंह रणसिंग,व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.राहीताई विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते श्रींची महापूजा,अभिषेक पार पडला.दत्त देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते देवस्थानचे, तानाजीराव गायकवाड यांनी उपस्थित भक्त गणांचे स्वागत केले.यावेळी ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग बोलत होते.

        रणसिंग पुढे म्हणाले की,गावाकडील जनतेची नाळ हरिनामाशी एकजूट असल्यानेच,एकमेकांबद्दलचा आदर, प्रेम जिव्हाळा अशी ऋणानुबंधाची नाती घट्ट आहेत.दत्त देवस्थान शहाजीनगर हे दत्त देवस्थान,भक्तगणांचे श्रद्धास्थान सामाजिक, धार्मिक,असे केंद्र निर्माण झाले आहे.नव्या पिढीला धार्मिक,अध्यात्मिक,वारसा याच माध्यमातून मिळतो आहे.असेही गौरवोद्गार वीरसिंह रणसिंग यांनी काढले. 

        यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे म्हणाले की,नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दत्त देवस्थान उभारणी कालावधीत सेवा करण्याची संधी मिळाली.शहाजीनगर परिसरात नागरिकांची भक्तगणांची वर्दळ सातत्याने मोठी असते.मनाला शांती आणि समाधान दत्त देवस्थानच्या दर्शनाने मिळते.असा विश्वास माजी सभापती विलासराव वाघमोडे यांनी व्यक्त केला.

** 
close