shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर यांच्या विद्यमाने पद्मश्री वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न.

वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर यांच्या विद्यमाने   पद्मश्री वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर 
यांच्या विद्यमाने शनिवार दिनांक ०३ डिसेंबर२०२२ रोजी नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी चे पद्मश्री वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथे सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सापांचे काही क्षणचित्रे दर्शवून कार्यक्रमांमध्ये सापाबद्दल असलेले गैरसमज तसेच आपल्या भागातील साप विषारी बिनविषारी व साप चावल्यानंतर करावयाचा प्रथम उपचार, मुलांच्या मनामध्ये सापाबद्दल असलेले प्रश्न त्याची उत्तरे त्यांना समजून सांगण्यात आली. तसेच आपल्या परिसरात साप, जखमी जंगली प्राणी तथा जखमी पक्षी आढळल्यास वन्यजीव संरक्षक  संस्था इंदापूर कडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

यावेळेस वन्यजीव अभ्यासक  कीर्तीकुमार लोंढे वन्यजीव संरक्षक संस्थेचे उपाध्यक्ष  अमित अडसूळ,
विकास सोनवणे, अभिजीत शिंदे, राज गाडे, सागर झेंडे  तसेच शाळेचे प्राचार्य श्री शिरसाट सर, शिक्षक स्टाफ,  विद्यार्थी उपस्थित होते
close