धनगर आरक्षण बाबतीत महाराष्ट्र सरकार लवकरच शिफारस पाठवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर ऐक्य परिषदेच्या समन्वयक सदस्य समोर बैठकीत सांगितले-
धनगर ऐक्य परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली माहिती.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्रातील धनगर समाजाचा गेल्या ७५ वर्षापासूनचा धनगड व धनगर या "र" आणि "ड" यातील फरकामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील धनगर व धनगड या शब्दाची दुरुस्ती करण्याची केंद्र सरकारकडे तात्काळ शिफारस करावी. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाची धनगड या चुकीच्या शब्दाची दुरुस्ती करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी दि. ०५ डिसेंबर २०२२ रोजी उजनी धरणामध्ये ५००० समाजबांधवासह जलसमाधी आंदोलन करणार होते.
या जलसमाधी आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागाकडुन महाराष्ट्र शासनाला आपल्या मागण्याबाबत सविस्तर अहवाल पाठविण्यात आलेला होता. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने धनगर बांधवांच्या मागण्याची दखल घेवुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या दालनात मंत्रालय मुंबई येथे दि. ५ डिसेंबर रोजी ११ वा. बैठक आयोजीत केली होती. ही बैठक सह्याद्री अतिथी गृहात झाली असून या बैठकीत धनगर आरक्षण बाबतीत महाराष्ट्र सरकारला काही तंत्रीक आडचणी जाणवतात त्या दुरु करून शिफारस पाठवणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले असल्याची माहिती धनगर ऐक्य परिषदेचे मुख्य समन्वयक डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी दिली.
तसेच जे अदिवाशांना ते धनगरांना या नुसार २३ योजना बाबतीत जानेवारी पर्यंत सर्व योजनांवर फंड देऊन सुरू करणार. मेंढपाळच्या साठी एक मोठी योजना सरकार आणत आहे. तसेच महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव यांचा वाडा रयत शिक्षण संस्थेने सोडण्यासाठी सरकार रयत शिक्षण संस्थेला पत्र पाठवणार आणी महाराजा यशवंतराव होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक बनवणार,तसेच जालना जिल्ह्य़ातील धनगर समाज बांधवांवर पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या चुकीच्या मारहाणी मुळे त्यांचे निलंबन करणार असे डॉ शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखालील धनगर ऐक्य परिषदेच्या शिष्टमंडळ यांच्या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज बांधव यांच्यासमोर जाहीर केल्याची माहिती डॉ शशिकांत तरंगे यांनी दिली.
तसेच धनगर ऐक्य परिषदेचे सर्व समन्वयकाच्या वतीने पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सरकारने जी भूमिका घेतली त्याचं स्वागत करून तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करतोय. जानेवारीपर्यंत जी भूमिका घेतली ती अमलात नाही आली तर निश्चितपणे महाराष्ट्रात पुन्हा धनगर आंदोलन करू अशा इशाराही त्यांनी यावेळी माहिती देताना दिला. यावेळी धनगर ऐक्य परिषदेचे समन्वयक सदस्य उपस्थित होते.

