शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक २२ डिसेंबर २०२२
उंबरे-ब्राम्हणी सहा गाव पाणी योजनेचे स्टील चोरीला ; दोन संशयीत पोलीसांच्या ताब्यात..!!
राहुरी : उंबरे- ब्राम्हणीसह सहा गाव पिण्याच्या पाणी योजनेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकामासाठी आणलेल्या स्टीलची गेल्या एक महिन्यापुर्वी चोरी झाली होती. या स्टीलच्या तपासासाठी उंबरे येथील दोघांना राहुरी पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी होत आहे. यातून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त होत आहे.
उंबरे-ब्राम्हणी सहा गाव पाणी योजनेचे स्टील चोरीला
1185 लिटर दारूसह 42 जणांना अटक
उंबरे येथील राहुरी शिंगणापूर रोडवरील तांबे पेट्रोल पंपाजवळ 15 टन स्टील ठेवले असता त्या स्टील मधून जवळपास 2 लाख 40 हजार रुपये किमंतीचे आठ टन स्टिल चोरीला गेल्याची फिर्याद या कामाचा निरीक्षक अमोल प्रभू थोरात यांनी राहुरी पोलीसांत दिली आहे. या फिर्यादीत थोरात यांनी म्हटले, उंबरे ब्राम्हणीसह सहा गाव पाणी योजनेच्या दररोजच्या बांधकामासाठी 15 टन स्टील पेट्रोल पंपाजवळ आणून ठेवले होते.
त्यामधून काम सुरू असताना 12 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी कामावर ठेवलेल्या साहित्याची पाहणी केली असता त्याठिकाणाहून शिल्लक राहीलेले जवळपास 8 टन स्टिल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. व त्यांनी या प्रकाराची माहिती आपल्या वरीष्ठांना कळविली. त्यानंतर हे स्टिल चोरीला गेल्याची त्यांची पुर्ण खात्री झाल्याने त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली होती.
त्यानंतर एक महिन्याने राहुरी पो.नि. प्रताप दराडे यांनी तपासाचे चक्र फिरवून उंबरे येथील हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय 19), अभिषेक बाबासाहेब हुडे (वय 19) या दोघांना चौकशी ताब्यात घेतले आहे. तपासात त्यांच्या कडून पोलीसांना मोठी माहिती हाती लागल्याचे समजते. त्यामुळे उंबरे परिसरातील अनेक मोठे मासे या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

