shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक! बदनामीची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीनंतर प्रकार उघडकीस..!!

धक्कादायक! बदनामीची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीनंतर प्रकार उघडकीस..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
सोमवार दिनांक १९ डिसेंबर २०२२

धक्कादायक! बदनामीची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रसूतीनंतर प्रकार उघडकीस..!!

राहुरी : तालुक्यातील कात्रड येथील अजमोद्दीन महंमद शेख (वय 28 वर्षे) या नराधामाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मोबाईलवर ओळख करून तिला बदनामीची धमकी देवून तिच्यावर नराधम आरोपीने वेळोवेळी अत्याचार केला. यातून पीडीत अल्पवयीन मुलगी गरोधर राहुन प्रसुती झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
          पीडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी या धक्कादायक प्रकारातून सावरत थेट पोलीसात तक्रार दिली. त्यावरून आरोपी अजमोद्दीन महंमद शेख याच्या विरुद्ध अत्याचार व पोस्को कायदा (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करत आरोपीला अटक केली.

श्रीरामपूरचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, राहुरीचे पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने राहुरी तालुक्यात पालकवर्गात खळबळ उडाली आहे. मुलगी अल्पवयीन तर आरोपी सज्ञान आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहे.
    या घटनेने राहुरी तालुक्यात पालकवर्गात खळबळ उडाली आहे . मुलगी अल्पवयीन तर आरोपी सज्ञान आहे समाजात मुलीं किती असुरक्षीत व अन्यायपीडीत आहेत त्यांच्या अज्ञानपनाचा कसा गैर फायदा उठवला जातो हे भयानक ,धक्कादायक वास्तव या घटनेतुन समोर आले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 


close