शौकतभाई शेख
श्रीरामपूर- स्नेहसंमेलन हा विद्यार्थी जीवनातील आनंद सोहळा असतो.या सोहळ्यात विद्यार्थ्यांना आपल्या अंगीभूत कलागुणांना सादर करण्याचे व्यासपीठ मिळते.त्याचप्रमाणे सहजीवनाची अनुभुतीही येते.अपयश आले म्हणून निराश न होता यशासाठी अधिक परिश्रम करणे हा यशाचा मंञ असल्याचे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना संलग्न अशोक आयडीअल स्कूलचे स्नेहसंमेलन श्री.मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. स्टेट बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील कवडे, दै.पुण्यनगरीचे वृत्त संपादक विकास अंञे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी लायन्स क्लबचे प्रविण गुलाटी, श्रीमती गुलाटी, खटोड कन्या विद्यालयाच्या अनिता जोशी, स्टेट बँकेचे सहाय्यक व्यस्थापक आनंद चित्ते, संजय कासलीवाल, राजेंद्र कंञोड महाराज, अशोक बँकेचे चेअरमन प्रा. एस.झेड. देशमुख, व्हा.चेअरमन अॕड. सुभाष चौधरी,अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोक ग्रा. शि. संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, सचिव सोपानराव राऊत, बाबासाहेब काळे, संचालक बाबासाहेब आदिक,आदिनाथ झुराळे, अमोल कोकणे, रामभाऊ कसार, विरेश गलांडे, नानासाहेब मांढरे, बाळासाहेब शिंदे, मुळा- प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे,अॕड.पृथ्वीराज चव्हाण, शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सहसचिव भास्कर खांडागळे, माजी सभापती सुनिताताई गायकवाड, युवा नेते निरजभैय्या मुरकुटे, स्वप्नाली कवाडे, विद्यार्थी प्रतिनिधी जयवंत उंडे, विद्यार्थीनी प्रतिनिधी श्रावणी कसार उपस्थित होते.
मुख्य अतिथी दै.पुण्यनगरीचे वृत्तसंपादक विकास अंञे म्हणाले की, सध्या समाज, पालक आणि विद्यार्थ्यांना मोबाईलसारख्या प्रसार माध्यमाने घेरले आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करणे पालकांचे कर्तव्य असते पण आजचे पालक सगळी जबाबदारी शिक्षकांवर टाकून आपली जबाबदारी झटकतात. स्नेहसंमेलन हे विद्यार्थांचे स्वत्व सिध्द करण्याचे व्यासपीठ आहे. डाॕक्टर, इंजिनियर, एम.पी.एस. सी.,स्पर्धा परिक्षा यात कमी संधी आहे. या व्यतिरिक्त अनेक क्षेञात व्यापक संधी आहे. त्याचा विद्यार्थांनी विचार केला पाहिजे. श्री.मुरकुटे यांनी खेळ व व्यायामाच्या माध्यमातून हे सिध्द केले आहे.
श्री.मुरकुटे यांनी ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन ज्ञानदिप तेवत ठेवला आहे, असे सांगून कविवर्य सुरेश भटांची "जीवन खूप सुंदर आहे" या कवितेतून विद्यार्थांना आनंदी जीवन जगण्याचा मंञ दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी अशोक आयडीअल स्कूलबद्दल आणि तेथे उपलब्ध डीजीटल क्लासरुम, कंम्प्युटर लॕब, ग्रंथालय, सायन्स लॕब, क्रीडा सुविधा याबाबत सविस्तर विवेचन केले. यावेळी श्री.स्वनील कवडे, सौ.अनिता जोशी, प्रविण गुलाटी यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रईस शेख यांनी अहवाल वाचन केले.
अध्या.सुनिल बागुल, अध्या.रेश्मा जंगले, अध्या.रुपाली देशमुख, अध्या.चिञा मुठे यांनी सूञसंचलन केले. संगीत शिक्षक गणेश धर्माधिकारी व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत तसेच इंन्स्ट्रुमेंटल साँगचे सादरीकरण केले. विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक प्रतिनिधी मनिषा ञिभुवन, अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.

