शौकतभाई शेख
श्रीरामपुर- येथील लोयोला चर्च मध्ये मध्यरात्रीचा मिसा रेव्ह फादर अनिल चक्रनारायण यांनी अर्पण करून बाळ येशू या पृथ्वीतलावर का जन्माला आला ? याबाबत सुंदर प्रवचन केले व २५ डिसेंबर रोजी मिस्साचे प्रमुख याजक पद रेव्ह.फा.सुनील गायकवाड यांनी भुषविले.
बाळ येशूच्या जन्माबाबत माहिती देवून,बाळ येशू वर विश्र्वास ठेवा. मानवजातीचे कल्याण, तारण व ऊध्दार होण्यासाठीच प्रभू येशूने गाईच्या गोठ्यात जन्म घेतला याबाबत सुंदर प्रवचन फा. सुनील गायकवाड केले .
मिस्सा संपल्यानंतर संत लोयोला चर्चच्या वतीने लोयोला संदेश विशेषांकाचे प्रकाशन तालुक्याचे आमदार लहू कानडे यांचे शुभहस्ते व उपनगराध्यक्ष करण ससाणे,सिद्धार्थ मुरकुटे,सचिन गुजर, तसेच प्रमुख संपादक फा. ज्यो गायकवाड व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कमलाकर पंडीत यांनी केले.नाताळ सणानिमित्त शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
आ.लहू कानडे, करण ससाणे, सचिन गुजर,सिध्दार्थ मुरकुटे, प्रकाश ढोकणे,बाबासाहेब दिघे, लकी सेठी,अशोक कानडे, महेंद्र त्रिभुवन, दत्तात्रय सानप,ज्ञानेश्वर मुरकुटे,सुभाष तोरणे,डाॅ.रविंद्र कुटे, रवींद्र गुलाटी ,सुभाष त्रिभुवन, निलेश भालेराव आदी मान्यवरांनी नाताळ सणाच्या ख्रिस्ती बांधवाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाताळ सणाचा आंनद ओसंडून वाहत होता.नाताळ सणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फा.ज्यो गायकवाड, ,फा. संपत भोसले, फा.सुनील गायकवाड सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडीत, उत्तम गायकवाड, विजय त्रिभुवन, डॅनियल साळवे, प्रविण सात्राळकर,जाॅन धीवर, लाजरस गायकवाड, संदीप साळवे , राकेश दुशिंग, युवराज गायकवाड, रवींद्र त्रिभुवन तसेच, सौ. सुवर्णा बागुल,सौ.शोभा त्रिभुवन,सौ लत्ता बनसोडे, सौ.बेन्निग्ना पवार, सौ.विजया दळवी, निर्मला अमोलिक,कनोसा काॅन्हेटच्या सिस्टर लुईजा,सेंट लुकच्या सि.रिटा, सि.फातिमा सि.जॅकलीन आदींनी परिश्रम घेतले.

