शेती महामंडळाच्या कामगारांच्या प्रश्नावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची अधिवेशनाच्याप्रसंगी सभागृहात केले आश्वासित -आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती.
खंडकरी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी न्यायासाठी आग्रही मागणी केल्याची दिली माहिती .
इंदापूर प्रतिनिधी: हिवाळी अधिवेशनाच्याप्रसंगी सभागृहात शेती महामंडळाच्या कामगारांना हक्काच्या घरांसह दोन गुंठे जागा देण्यासह खंडकरी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून न्यायासाठी आग्रही मागणी केली. त्या आग्रही मागणीनुसार लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची म्हसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासित केले असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना दिली.
इंदापूर (जि. पुणे) येथील तसेच राज्यात पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा व औरंगाबाद या सात जिल्हयांमध्ये महाराष्ट्र शेती महामंडळाच्या एकूण १४ मळयावर हजारो कामगारांपैकी ८०% कामगार अनुसूचित जाती/जमाती, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत हे कामगार कच्च्या घरामध्ये व झोपड्यांमध्ये राहत असून या घरांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यांच्या राहत्या घराची पडझड झाल्याने त्यांचे संसार उघडयावर आले असून हे कामगार आपला जीव धोक्यात घालून त्याच पडक्या घरात राहून संसाराचा गाडा चालवत आहेत. शासनाच्या माध्यमातून त्यांना इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरेही मंजूर झाली असून त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना घरकुल मंजूर असूनही स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना घरकुल मंजूर असूनही जागेअभावी शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहवे लागत आहे, याबाबत शेती महामंडळाच्या राज्यातील कामगारांनी निवृत्त व रोजंदार कामगार कामावर असलेले व मयत कामगारांचे वारसदार यांना राहण्यासाठी शेती महामंडळाकडे शिल्लक असलेल्या जमिनीपैकी दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून व इंदिरा इंदिरा आवास घरकुल योजनेतून या कामगारांना घरासाठी घरकुले मंजूर होऊन राहण्यासाठी बांधून मिळावी अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
तसेच खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाटप करण्यात आले त्यावेळी जमीन भोगवाट वर्ग क्रमांक २ च्या होत्या या दहा वर्षानंतर भोगवाट वर्ग क्रमांक दोनच्या जमिनी चे रूपांतर भोगवट वर्ग १ मध्ये होणे अपेक्षित होते.
परंतु अद्यापही ते झालेले नाही .सरकारने याबाबत तातडीने वर्ग २ जमिनीचे १ मध्ये रूपांतर करण्याचा आदेश करण्यात यावा, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. याबाबत लवकरच आदेश काढण्यात येईल असे मंत्री महोदयांनी सांगितले.
शेती महामंडळातील वाटप करण्यात आलेल्या जमिनीवाटप करण्यात आलेल्या जमिनी ह्या क्षारपडूनाफिक आहेत त्याही बदलून देण्यात याव्या, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
शेतीमहामंडळ कामगार/कर्मचारी यांना त्यांचा शेती महामंडळाकडे थकीत असणारा ४ था व ५ व्या वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा व ६ वा वेतन आयोग लागू करावा. याचा राज्यात असणाऱ्या १४ मळ्यावरील कामगारांना याचा लाभ मिळेल.
ना. रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशीनूसार कामगारांना न्याय देण्यात यावा अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
या सर्व मागणीची दखल घेऊन मा.महसूल मंत्री यांनी एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असे आश्वासित केले ची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.

