shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर्या मोहितेची राज्यस्तरीय जूदो स्पर्धेसाठी निवड*

*आर्या मोहितेची  राज्यस्तरीय जूदो स्पर्धेसाठी निवड*
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक २३ डिसेंबर रोजी इंदापूर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय जूदो स्पर्धेमध्ये ४४ किलो खालील वजन गटात विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम इंदापूरमधील आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आर्या सुनील मोहिते हिने पुणे ग्रामीणचे प्रतिनिधित्व करून विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. तिची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल  प्राचार्या ज्योती जगताप,अनुराधा इनामदार,क्रीडाधिकारी महेश चावले,सर्व शिक्षक,पालक व विध्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. आर्या ही सध्या इंदापूर जुदो कराटे स्पोर्ट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिला  दत्तात्रय व्यवहारे, आजिनाथ बळगाणुरे, सुनील जाधव, क्रीडा शिक्षक संभाजी पवार इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.
close