shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

किशोर पवार यांचा जीवनप्रवास..!

प्रतिनिधी- आजच्या काळात अनेक युवक आपल्या परिस्थिती चे रडगाणे गातात, त्यामुळे ते आपल्या यश संपादन करू शकत नाही याला मात्र पिंपळगाव कोन्ज़ीरा येथील किशोर पवार हे अपवाद ठरले असून त्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता पी.एस.आय.या पदावर रुजू झाले आहेत.

           गरीबी मुळे अर्थवट शिक्षण सोडलेले नंतर मुक्त विद्यापीठाची पदवी घेऊन एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पी.एस.आय होण्याचे स्वप्न् सत्यात उतरविणारे संगमनेर  तालुक्यातील किशोर पवार यांनी आजच्या युवकापुढे आदर्श निर्माण केला आहे.

     किशोर पवार हे वडारी समजाचे असून यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण गावात झाले. बारावी संगमनेर ला पूर्ण केले. परंतु घरी गरिबी पाचविला पुजलेली, आई वडील दररोज मोल मजुरी करून प्रपंच चालवित असे, त्यांना कामात मदत म्हणून किशोर हे पण मदत करीत असे.पण हुशार असणाऱ्या किशोर यांना ह्या कामात काय लक्ष लागेना, शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हते. 
  अशातच त्यात पोलीस भरती सुरु झाली अन मग नशीब अजमवले अन ठाणे येथे भरती झाले. पण आता पोलीस शिपाई ऐवजी साहेब झालं पाहिजे असे स्वप्न पहायला सुरवात झाली. त्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. अन यशवन्तराव चव्हाण मुक्त विद्यापीठ च्या बाह्य विभागातून पदवी साठी प्रवेश घेतला. अभ्यास सुरु झाला. पण परत पैश्याची चनचन भासायला लागली. मग परत पोलीस भरती झाले. मात्र सा हेब होण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती ,त्यामुळे त्यांनी अजून नेटाने अभ्यास सुरु केला.त्यांना २०१७ अन २०१८ च्या एम.पी.एस.सी. परीक्षेत पी.एस.आय. होण्याचे स्वप्न थोडक्यात हुकले.पण २०२२ ला त्यांची जिद्द कामी आली.  आणि ते राज्यात ७९ व्या क्रमांक ने पी. एस.आय झाले.
      त्यांच्या या जिद्दीने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आणि युवकांनी परिस्थितिचा बाऊ न करता जिद्दीने आपले ध्येय गाठावे जिवनात यश मिळतेच असा संदेश किशोर पवार यांनी दिला.
close