shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरीची कन्या कु. आकांक्षा जाधव चे राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा ४३ किलो वजनी गटातून भारतातील पहिल्या दहा मुलींमध्ये निवड.

वडापुरीची कन्या कु. आकांक्षा जाधव चे राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा ४३ किलो वजनी गटातून भारतातील पहिल्या दहा मुलींमध्ये  निवड.

वडापुरी गावाचे नावलौकिक देशात केल्याबद्दल ग्रामस्थांनी  अभिनंदन करून केले कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी येथील सुरेश मारुती जाधव या शेतकरी कुटुंबातील कन्या आकांक्षा सुरेश जाधव या वडापुरीच्या मुलीने हरियाणा रोहतक येथे दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या ग्रँड फ्री स्टाईल ग्रे को रोमन राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा ४३ किलो वजनी गटातून भारतातील पहिल्या दहा मुलींमध्ये तिची निवड झाली असून तिच्या या यशाने वडापुरी गावाचे नाव देशामध्ये नावलौकिक झाले असून तिला या मिळालेल्या यशाबद्दल वडापुरी गावातील ग्रामस्थांच्या वतीने तिचे  विशेष कौतुक करीत अभिनंदन केले जात असून पुढील वाटचालीस तिला ग्रामस्थांच्या वतीने भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
close