राधिका विद्यालय इंदापूरच्या दोन विद्यार्थ्यांनी विभागीय जुदो स्पर्धेमध्ये मिळवले यश.
अजिंक्य नरुटे यास गोल्ड मेडल तर कु. सानिया माने हिने मिळविले सिल्वर मेडल .
इंदापूर प्रतिनिधी: नुकत्याच शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे पार पडलेल्या विभागीय जुदो स्पर्धेमध्ये राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर च्या अजिंक्य अरुण नरुटे यांनी ३० किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवले तर कु. सानिया माने हिने ७० किलो वजन गटांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल मिळविले. अजिंक्य नरुटे याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अमरावती येथे निवड झाली. यशस्वी खेळाडूंचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे मा. उपनगराध्यक्ष अरविंद विष्णू वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विजयी खेळाडूंचे स्वागत हलगीच्या ठेक्यामध्ये व टाळ्यांच्या गजरामध्ये करण्यात आले

