shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र आणि थोर महापुरुषांच्या विषयी सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांचा जाहीर निषेध..!

नगर । प्रतिनिधी : एकीकडे प्रचंड महागाई वाढली आहे,बेरोजगारी वाढली आहे,महाराष्ट्रातून अनेक मोठ-मोठे उद्योग बाहेर गेले आहे,आजही महाराष्ट्रातल्या गोर-गरिबांना त्यांच्या हक्काचं रेशन वेळेवर मिळत नाही,जाचक करांमुळे छोटे उद्योग अडचणीत आले आहे,अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना व नागरिकांना नुकसान भरपाई दिली जात नाही,शेतकरी आत्महत्या करत आहे.

खाजगीकरणाच्या सपाट्यामुळे इथला कामगार संकटाच्या खिंडीत सापडला आहे,गोरगरिबांच्या हाताला काम नाही.अधिकाऱयांना हातचं बाहुलं बनवून सर्रासपणे कायद्याचा गैरवापर केला जात आहे.या मूळ मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते सातत्याने महाराष्ट्राविषयी व थोर महापुरुषांच्या विषयी बेताल वक्तव्य करत आहे.

       भाजपा नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांच्या विरोधात निषेध करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तणाव निर्माण होईल,महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होईल यासाठी भडक वक्तव्य या नेत्यांकडून केली जात आहे.याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
        
नुकतच भाजपाचे आ.उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य केलं.यापूर्वी भाजपाचे आ.प्रसाद लाड हे शिवरायांचा जन्म कोकणात झाला.असा चुकीचा इतिहास महाराष्ट्राला सांगत आहे.भाजपाचा प्रवक्ता असलेला सुधांशू त्रिवेदी म्हणतो की शिवरायांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली,छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.हे सर्वश्रुत असतानाही भाजपाचा आ.गोपीचंद पडळकर म्हणतो की अफजलखानाने शिवरायांचा कोथळा बाहेर काढला.ही असली मोघम वक्तव्य कशाच्या आधारावर करतात ही अर्धवट माणसं..

          भाजपचा आ.मंत्री.मंगल प्रभात लोढाने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी केली.भाजपाचे आमदार महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या शिर्डी मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून राहाता तहसीलच्या गोदामात डांबून ठेवला आहे.ही विटंबनाच आहे ना...आणि अत्यंत खेदाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले परंतु फक्त भाजपाच्या हितासाठी काम करणारे श्री कोष्यारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी अपशब्द वापरले,छत्रपती शिवाजी महाराजां विषयी अपशब्द वापरले,मारवाडी व्यापारी मुंबई सोडून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल...असं म्हणून महाराष्ट्राचा उपहास करण्याचा प्रयत्न केला.संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी असं बोलणं अत्यंत चुकीच आहे.अस वारंवार का सुरू आहे?*
        *इतक्या बिनधास्तपणे आणि बेताल वक्तव्य करणारे हे सर्वच्या सर्व एकाच पक्षाचे आणि आरएसएस ची विचारधारा असलेले नेते आहेत.यामध्ये मूळ मुद्यांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हेतू तर आहेच परंतु जाती-जातीत भांडणे लावण्याचा,धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि बहुजन वादी विचारधारा मोडून काढण्याचा यांचा विचार तर नाही ना?*

*पण सुजाण असलेल्या या महाराष्ट्रातील जनता,विशेष करून तरुणाई यापुढे तुमच्या या असल्या षडयंत्रांना बळी पडणार नाही.जे यांच्या पोटात आहे ते आपसूकपणे यांच्या ओठात येत आहे हे अनावधानाने होत नसून जाणीवपूर्वक केलं जातं आहे.

       मंत्री असलेले अब्दुल सत्तार महिलांविषयी अपशब्द वापरत आहेत,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिषांना हात दाखवून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे.आम्ही हिंदुत्व टिकविण्यासाठी महाविकास आघाडीतून बाजूला झालो असं म्हणून हिंदुत्ववादी सरकार स्थापन केलेल असतानाही शिर्डीच्या श्री साईबाबांच्या मंदिरात फुल-हार नेण्यास सामान्य साईभक्तांना बंदी का आहे.
(मुख्यमंत्री घेवून गेले होते ना फुलांचा हार बाबांच्या मंदिरात म्हणून सामान्य साई भक्तांना बंदी का? असा प्रश्न) याचा आम्ही जाहीर निषेध करतो
-
सचिन चौगुले पा.
अध्यक्ष-शिर्डी शहर कॉंग्रेस कमिटी.
नगरसेवक-शिर्डी नगरपंचायत.
close