शिर्डी प्रतिनिधी ( संजय महाजन ):-
पुणे जिल्हा परिषद आयोजित तालुकास्तरीय स्पर्धा मावळ तालुक्यातील सदुंबरे, तळेगाव दाभाडे, सोमाटणे फाटा, कामशेत अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या पार पडल्या. या सर्व स्पर्धा प्रकारामध्ये व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू.मेहता ज्युनियर कॉलेज मधील स्पर्धकांनी तब्बल 24 पारितोषिकांची कमाई करून तालुक्यामध्ये अव्वल स्थान अबाधित राखले आहे.
यंदाच्या हंगामामध्ये सर्वात जास्त पारितोषिक मिळवणारी तालुक्यातील व्ही. पी. एस ही एकमेव शाळा ठरली. स्पर्धा 17 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडल्या. कबड्डी या सांघिक खेळामध्ये 19 वर्षाखालील मुले (प्रथम क्रमांक), 14 वर्षाखालील मुले (प्रथम क्रमांक), 17 वर्षाखालील मुले (तृतीय) क्रमांक) खो खो सांघिक खेळामध्ये 19 वर्षाखालील मुले ( प्रथम क्रमांक), 19 वर्षाखालील मुली (द्वितीय क्रमांक). हॉलीबॉल खेळामध्ये विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
वैयक्तिक खेळामध्ये देखील विद्यार्थ्यांनी विजयश्री खेचून आणली. राजश्री नाणेकर या विद्यार्थिनीची निवड (विभागीय स्तरावरून राज्य पातळीवर झाली) यश पडवळ (विभागीय सिल्वर ), साई गायकवाड (सिल्वर ), निशांत ओव्हाळ (कराटे गोल्ड), सिध्दी येवले (कराटे गोल्ड), श्रेयस शेलार (कुस्ती सिल्वर ) सबा शेख, 19 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये (मुले आणि मुली) आयुष कदम, किसन तोमर, अजय बेंगळे, धनराज पाठारे, सृष्टी साबळे, पूजा हेमाडे प्रथम क्रमांक पटकावला. तायक्वांदो खेळ प्रकारामध्ये आदित्य मोरे, उज्जौर सय्यद, मुसेब शेख, आतिक शेख, आदित्य भालेराव, साक्षी घुमे, नेहा टाक या सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड तर दक्ष साबळे, अक्षय इंगवले, उद्धव शिंदे, सिध्दी गोणते यांना सिल्वर पदक प्राप्त झाले.
अॅथलेटिक्स खेळ प्रकारांमध्ये कुणाल ठोंबरे (200 मीटर प्रथम), सृष्टी लापूरकर (200 मीटर प्रथम), सिद्धांत चव्हाण (800 मीटर द्वितीय), अनिल कोकरे (1500 मीटर तृतीय), सोनू जाट (200 मीटर तृतीय), सिध्दी गायकवाड (400 मीटर तृतीय), साक्षी झोरे (लांब उडी तृतीय), मीनाक्षी आहेर (1500 मीटर प्रथम), मिताली काळे (100 मीटर तृतीय), साक्षी कापसे (400 मीटर तृतीया) असे यश संपादन केले.
19 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुले आणि मुली या दोन्ही संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या वर्षाच्या यशामध्ये विद्यार्थ्यांबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक गंगाधर गिरमकर, वैशाली तारू, संकेत कवडे, रेवती बोके, शितलकुमार सुतार, संजय राऊत, श्रीकांत म्हसकर या सर्वांचे विद्या प्रसारिणी सभेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष आणि शाला समिती अध्यक्ष डॉ. गो. व्यं. शिंगरे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, शाळा समिती सदस्य भगवान आंबेकर, प्राचार्या अंजनी गानू, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक उदय महिंद्रकर, पर्यवेक्षिका सुनीता ढिलें, पर्यवेक्षक विजय रसाळ, मुख्य लिपिक कुंडलिक आंबेकर यांनी कौतुक केले.

