इंदापूर मध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालात भाजप राष्ट्रवादी कडून दावे प्रतिदावे .
भाजपाने १९ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५ ग्रामपंचायतीवर केला दावा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर मध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालात भाजप राष्ट्रवादी कडून दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत.इंदापूर तालुक्यात 26 ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली असताना
भाजपाने 19 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 15 ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.यावरून
आता सरपंच पदाच्या संख्येवरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जुंपल्याचे पहायला मिळाले.
इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले, यामध्ये अनेक लढती अटीतटीच्या झाल्याचे दिसून आले. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप गटाने 19 ग्रामपंचायतीवर भाजप चा झेंडा फडकवल्याचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही 12 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची 3 ग्रामपंचायतीवर समिश्र सत्ता आल्याचे सांगितल्याने नक्की कोणत्या ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता हे येणारा काळच ठरवनार आहे.
तालुक्यातील लाखेवाडी येथे राष्ट्रवादीचे नेते श्रीमंत ढोले यांच्या पत्नी चित्रलेखा श्रीमंत ढोले तर बेलवाडी येथे भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांच्या पत्नी मयुरी शरद जामदार या विजयी झाल्या मात्र दोन्ही ठिकाणी विरोधी सदस्य जास्त निवडून आल्याने लाखेवाडी व बेलवाडी येथील निकालात सिंह आला पण गड गेला अशी राष्ट्रवादी व भाजपची अवस्था झाल्याचे पाहायला मिळाले.

