shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोरी गावातील वार्ड क्र. ५ मधून राजेंद्र शिंदे, ज्योती शिंदे, रुक्मिणी जगताप यांचा विजय.ग्रामस्थांनी विजयाचा जल्लोष करत केले अभिनंदन.

बोरी गावातील वार्ड क्र. ५ मधून राजेंद्र शिंदे, ज्योती शिंदे, रुक्मिणी जगताप यांचा विजय.

ग्रामस्थांनी विजयाचा जल्लोष करत केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये बोरी गावातील वार्ड क्रमांक ५ मधील राजेंद्र महादेव शिंदे(८५८), ज्योती सागर शिंदे (८२३),रुक्मिणी विजय जगताप(७५३) हे जय मल्हार भैरवनाथ ग्रामविकास पॅनल बोरी यामधून बहुमत मिळवत विजयी झाले. यावेळी या उमेदवाराच्या वतीने सांगण्यात आले की, हा विजय खेचून आणण्यासाठी वार्ड क्रमांक ५ मधील सर्व ग्रामस्थ व पॅनल मधील इतर मान्यवर यांचा मोलाचा वाटा आहे.  हा विजय आमचा नसून येथील सर्वसामान्य जनतेचा आहे.
यावेळी वार्ड क्रमांक ५ मधील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे यांनी विजय उमेदवारांचे अभिनंदन केले.
close