shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झगडेवाडीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे .हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व गावाचा आहे - अतुल झगडे

झगडेवाडीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे .

हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व गावाचा आहे - अतुल झगडे.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली यामध्ये झगडेवाडी गावचे सुपुत्र अतुल गौतम झगडे  बहुमताने विजय प्राप्त करीत झगडेवाडी ग्रामपंचायत वर थेट जनतेतून सरपंच पदी विराजमान झाले. तसेच या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच पदासाठी ३ उमेदवार उभे होते तसेच वार्ड क्रमांक २ मध्ये ४ उमेदवार, वार्ड क्रमांक ३ मध्ये ५ उमेदवार निवडणुकीसाठी होते. यामध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनल झगडेवाडी यामधील उमेदवार सरपंच पदी अतुल गौतम झगडे बहुमताने विजयी झाले तर ग्रामपंचायत सदस्य पदी दादाराव जालिंदर झगडे, मोनाली दीपक झगडे, छाया सुनील झगडे हे विजय झाले व शिवशंभो ग्रामविकास पॅनल झगडेवाडी यामधील धनाजी भीमराव मोरे हे विजय झाले. वार्ड क्रमांक १ मधील पूनम नागेश अभंग, सचिन रतन अभंग, संगीता तुळशीराम बारवकर हे बिनविरोध निवडले गेले आहेत.
यावेळी अतुल झगडे म्हणाले की, हा विजय माझ्या एकट्याचा नसून अवघ्या गावाचा आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली मागील पंचवार्षिक मध्ये जवळपास साडे सोळा कोटी रुपयाचा विकास निधी खेचून आणला व यातून काही कामे पूर्ण झाली तर काही प्रगतीपथावर आहेत. या माध्यमातून गावात अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या या कामाची पावती म्हणून जनतेने माझा मतदान रुपी आशीर्वादाने विजय केला तसेच पॅनल मधील ग्रामपंचायत सदस्य यांनाही निवडून दिले त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद मानतो अशी प्रतिक्रिया झगडे यांनी दिली.
close