shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाला पर्यटन क्षेत्र घोषित केल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाचा बंद बंद बंद ...


प्रतिनिधी : संजय वायकर

शेवगाव : २१ /  झारखंड सरकारने जैन समाजाचे २० जैन तीर्थंकरांचे आणि अनेक संतांचे मोक्षस्थळ असलेल्या श्री सम्मेद शिखरजी (पारसनाथ) पर्वतराज या तीर्थक्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला जैन समाजाच्यावतीने कडाडून विरोध केला जात असून झारखंड सरकारच्या निषेधार्थ जैन समाजाच्यावतीने बुधवारी दि. २१ डिसेंबर रोजी बंदचे आवाहन केले होते .सर्व समाजातील व्यावसायिकांनी आपापली आस्थापने, ऑफिसेस बंद ठेवून झारखंड सरकारच्या घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला आहे .

 शेवगाव  शहरातील सर्व जैन  व्यावसायिकांनी या बंदमध्ये सामील होऊन  जैन समाजास उपकृत करण्यासाठी सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राची पवित्रता अबाधित राहण्याविषयी झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध बुधवार दि . २१ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर निषेध मोर्चा काढला . यावेळी सर्व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक कमलेश गांधी ,शांतीलाल जी, कन्हैयालाल बंब, राजेंद्र मुनोत, संजय,प्रदीप मेहेर,ताराचंद भंडारी , अनिल गांधी,सुनिल देसरडा,डॉ .राजेंद्र गांधी, प्रा. आदिनाथ अन्नदाते, प्रा.खुळे सर,नितीन भोसे,अशोक देशमाने,प्रदीप ढोले,सुनील रत्नपारखी, श्री.डेरे, धोंडलकर,गौतम शिंगवी , मनोज गांधी,सुमित पितळे ,सुशील भंडारी, राहुल बंब ,सागर गांधी,किरण मुनोत 
पंकज गांधी ,राहुल मेहेर , लोकेश शिंगवी,पारस बंब , संतोष बाफना,प्रणित गांधी ,कमलेश सिसोदिया, सुविध बोथरा आदी सकल जैनबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close