नाशिक (प्रतिनिधी) :
सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु झाले आहे, या अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी अल्पसंखयांक विकास विभागाकडून अधिसूचना काढत महाराष्ट्र राज्य हज कमेटीवर नवीन सदस्याची नियुक्ति केली आहे, त्यात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची पुन्हा महाराष्ट्र राज्य हज कमेटीच्या सदस्यपदी नियुक्ति करणयात आली आहे,हाजी एजाज देशमुख यांचेसह सदरील अधिसूचनेद्वारे जालना येथील ज्येष्ठ नगरसेवक हाजी फिरोज लाला चन्नुमिया शेख तांबोळी,जामखेड जि. अहमदनगर येथील सलीम मोहम्मदनुर बागवान आणि ठाणे येथील इरफान इस्माईल शेख यांची देखील महाराष्ट्र राज्य हज कमेटीच्या सदस्यपदी नियुक्ती करणयात आली आहे.
हाजी फिरोज लाला चन्नुमिया शेख तांबोळी यांच्या या निवडीबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष हाजी तनवीर तांबोळी यांनी ऑर्गनायझेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करुन पुढील उज्वल कार्यास शुभेच्छा दिल्या,यावेळी
उमर तांबोळी,झहीर अब्दुल सत्तार,बाबरभाई शेख,आदि मान्यवर उपस्थित होते
सोबतच हज कमेटीवर निवड झालेल्या सर्वच मान्यवरांच्या भावी वाटचालीस ऑर्गनायझेशनच्यावतीने शुभेच्छाही देण्यात आल्या.
वृतसंकलन: शौकतभाई शेख
प्रसिद्धी प्रमुख: ऑ.इं.मु.ओ.ऑ./अ.नगर जिल्हा

