गोखळी येथील माळुंजकर फार्म वज्रेश्वरी दत्त मंदिर येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
अनेक भाविकांनी दत्त जयंती सोहळ्यास उपस्थिती दर्शवून पुष्प अर्पण करीत घेतले दर्शन.
महिलांनी दत्त जन्म सोहळ्यानिमित्त गायले पाळणा गीत.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी नजीक असलेले माळुंजकर फार्म येथील वज्रेश्वरी दत्त मंदिर येथे दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत दत्त जन्म सोहळ्यानिमित्त दत्त जन्म कथेवर आधारित हरी किर्तन हरिभक्त परायण महादेव क्षीरसागर महाराज यांचे झाले. त्यास अनेक टाळकऱ्यांनी मृदुंग वादक, पेटीवादक यांनी उत्तमरीत्या साथ दिली. या कीर्तन सोहळ्यामध्ये गोखळी ,तरंगवाडी पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्तांनी व इंदापूर शहरातील अनेक मान्यवर व भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवून या दत्त जयंती जन्म सोहळ्याचा आनंद घेतला.
यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम जय घोषामध्ये टाळ मृदुंग यांच्या गजरात उपस्थित सर्व भाविक भक्तांनी पुष्पवृष्टी करत श्री दत्त जन्म सोहळा मोठ्या आनंद उत्साहात साजरा केला.
यावेळी उपस्थित महिलांनी दत्त जन्म सोहळ्यानिमित्त पाळण्याला झोका देत पाळणा गीत गायले. यावेळी या महिला वर्गामध्ये चैतन्य पूर्वक आनंद उत्सव दिसून आला. यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना माळुंजकर परिवार व प्रसिद्ध आर्किटेक्ट वसंतराव माळुंजकर यांच्या सुनियोजित कार्यक्रमानुसार महाप्रसाद करण्यात आला होता त्याचा लाभ उपस्थित भाविक भक्तांनी घेतला. यावेळी मंदिर परिसर व शिखर रंगबिरंगी लाईट द्वारे उठून दिसत होते.

