shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला केलेल्या आरोपीस अटक न केल्याच्या निषेधार्थ व न्यायासाठी १० डिसेंबरला इंदापूर बंद तर १२ डिसेंबरला जंक्शन पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको.

अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला केलेल्या आरोपीस अटक न केल्याच्या निषेधार्थ व न्यायासाठी १० डिसेंबरला इंदापूर बंद तर १२ डिसेंबरला  जंक्शन पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको.

वडार पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला केलेल्या आरोपीस अटक न केल्याच्या निषेधार्थ व पीडित अल्पवयीन मुलगी व तिचे कुटुंबाला न्याय देण्यासाठी सर्व वडार संघटना व बांधवांच्या वतीने शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी इंदापूर बंद तर १२ डिसेंबर २०२२ रोजी जंक्शन पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको आंदोलनाबाबत वडार पॅंथर संघटना व इंदापूर शहर वडार बांधव व इतर संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक पुणे यांच्या नावे दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुजावर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
 सदर निवेदनात म्हटले आहे की, वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक ३०/ १२/ २०२२ रोजी दाखल गु. र. नं. ०५३३/  २०२२ मधील आरोपी रोहित  चतुर याने अल्पवयीन मुलीस शाळेत जाता येता एकतर्फी प्रेमातून सतत त्रास देऊन दिनांक ३०/ ११/ २०२२ रोजी किराणा बाजार आणत असताना मुलीच्या नातेवाईकांच्या समक्ष चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर आरोपीस अद्याप अटक न झाल्याने पीडित कुटुंब प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भयभीत झालेली असून आरोपीने केलेल्या हल्ल्यामुळे पीडित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत असून तिचेवर आणखीन रुग्णालयामध्ये औषध उपचार चालू आहेत. जंक्शन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे मनावर दडपण येऊन भयभीत झालेले आहेत. गुन्हायातील आरोपी मोकाट असल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आरोपीस अटक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोपीस अटक न केल्याचे निषेधार्थ इंदापूर बंद चे आंदोलन करीत आहोत. घडलेल्या निर्भया पिढीतला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच भविष्यात इतर कोणत्याही नराधमाने दुसऱ्या शाळकरी मुलीवर किंवा इतर मुलीवर महिलांवर अन्याय अत्याचार करू नये याकरिता संविधानिक मार्गाचा अवलंब करीत शनिवार दिनांक १०/१२/२०२२ रोजी इंदापूर बंद ठेवण्यात येत आहे तसेच दिनांक १२/१२/२०२२ रोजी जंक्शन पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान विपरीत काही घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन वडार पॅंथर संघटनेचे उपाध्यक्ष अनिल अण्णा पवार, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस तानाजी धोत्रे यांच्या वतीने तसेच कोंडीबा घोडके, अविनाश चौगुले, रामा पवार ,अमजद शेख, जितेंद्र विटकर, रोहिदास पवार, लखन चौगुले, बापू पवार, दत्ता घोडके, भैय्या चौगुले, बाबासो विटकर, बापू विटकर, ललेंद्र शिंदे, भाऊ पवार, अनिल चौगुले, रोहिदास पवार ,आबा सोनवणे ,प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे इत्यादींच्या सही चे निवेदन पत्र देण्यात आले आहे.
close