shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा..!

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

दिनांक 21 /12/ 2012 व 22 /12/ 2022 रोजी संगमनेर मध्ये जिल्हा समाज  कल्याण कार्यालय व संग्राम संगमनेर तसेच संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय व डॉक्टर देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर मध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संगमनेर येथील संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंध मतिमंद मूकबधिर व अस्थी व्यंग प्रवर्गाच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये साई सेवा निवासी मतिमंद शाळा शिर्डी येथील सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसनजी देवढे तसेच सहाय्यक लेखाधिकारी गांगुर्डे, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे लेखाधिकारी चव्हाण, तसेच सहाय्यक सल्लागार दिनकरजी नाठे शिक्षक नेते हिरालाल पगडाल संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

      संग्राम संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर नामदेव गुंजाळ व उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे उपस्थित होते. 
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संगमनेरमध्ये कवी अनंत फंदी नाट्यगृहात सायंकाळी विविध नृत्य स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धांसाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या स्पर्धा मधून प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिके देण्यात आली या कार्यक्रमानंतर संगमनेर मध्ये २२ डिसेंबर २०२२ रोजी संगमनेर मधून भव्य रॅली काढण्यात आली. संगमनेर वासीयांनी दिव्यांग विद्यार्थ्याचे रांगोळ्या काढून व खाऊ वाटून स्वागत केले. सदर कार्यक्रम प्रसंगी युवा नेते सत्यजित तांबे हजर होते. त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
     या रॅलीमध्ये  साई सेवा निवासी मतिमंद मुलांची शाळा शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी भव्य विठ्ठल रथ काढून संगमनेर वासियांना विशेष आकर्षित केले. रथ बनवण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले ,कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे, विशेष शिक्षक श्री दीपक कोकणे, विशेष शिक्षक श्री नासिर देशमुख, विशेष शिक्षक श्री ओम प्रकाश खताळ, श्री शंकर सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली.

    रॅली झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
   दोन दिवसाचे या कार्यक्रमांमध्ये संगमनेर येथील सिद्धकला महाविद्यालयाचे दहा डॉक्टर व त्यांची अम्बुलन्स सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत उपस्थित होते. तसेच घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे पथक हजर होते. तसेच संगमनेर येथील १०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स व त्यांचे पथक यांनीही सेवा बजावली.

     हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संग्रामकबधिर विद्यालय संगमनेर येथील मुख्याध्यापक श्री सुनील शिवनाथ कवडे व सर्व कर्मचारी आणि डॉक्टर देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालय संगमनेर येथील मुख्याध्यापक श्री चांगदेव खेमनर सर व सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
close